काँग्रेस व राष्ट्रवादीसमवेत आम्ही होतो, तेव्हा त्यांनी आमची पुरेपूर फसवणूक केली. आता महायुतीत तसा अनुभव येऊ नये, अशी सूचक टिपणी करत रिपाइंने पिंपरी राखीव मतदारसंघावर यापूर्वी सांगितलेला दावा कायम ठेवला आहे.
रिपाइं ब्रिगेडच्या पिंपरी शहराध्यक्षपदी जयेश पिल्ले यांची नियुक्ती करण्यात आली, त्याची घोषणा ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, पक्षाच्या सरचिटणीस व नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत यांनी पत्रकार परिषदेत केली. सध्या पिंपरी मतदारसंघ भाजपकडे आहे. त्यावर रिपाइंचा डोळा असून सोनकांबळे प्रबळ दावेदार आहेत.
सोनकांबळे म्हणाल्या, शहरातील मतदारसंघाची सेना-भाजपमध्ये वाटणी झाली आहे. मात्र, रिपाइंला पिंपरी मतदारसंघ हवा असून पक्षाने यापूर्वी केलेली मागणी कायम आहे. गेल्या वर्षी रिपाइंने पिंपरीत निवडणूक लढवली होती. या ठिकाणी दलितांचे हक्काचे मतदान आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात पिंपरी सुटला पाहिजे. यापूर्वी दोन्ही काँग्रेसने आम्हाला फसवले आहे, तशी फसवणूक महायुतीने करू नये. पिंपरीच्या मागणीसाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे आग्रह धरणार असून उमेदवारीचा निर्णयही तेच घेणार आहेत. जागा रिपाइंला सोडून तेथे बंडखोर उभा करण्याची खेळी झाल्यास अन्य मतदारसंघांत प्रत्युत्तर दिले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे महायुतीने फसवू नका
काँग्रेस व राष्ट्रवादीने आमची पुरेपूर फसवणूक केली. आता महायुतीत तसा अनुभव येऊ नये, अशी सूचक टिपणी करत रिपाइंने पिंपरी राखीव मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे.
First published on: 03-10-2013 at 02:32 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi still firm on pimpri constituency