पुणे : इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ आणि अन्य सर्वच सेवा-सुविधांच्या दरात होत असलेल्या वाढीच्या कचाटय़ात साबुदाणा सापडला असून तामिळनाडूतील साबुदाणा उत्पादक कंपन्यांनी अचानक दरात वाढ केली आहे. साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. व्रतवैकल्यांचे महिने वगळता साबुदाण्याचे दर वर्षभर स्थिर असतात. मात्र इंधन दरवाढीमुळे वर्षांत दुसऱ्यांदा साबुदाण्याच्या दरात वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले काही महिने साबु दाण्याचे दर स्थिर होते. मात्र, सातत्याने इंधन दरवाढ होत असल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. साबुदाणा उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील साबुदाणा उत्पादक तसेच प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांनी साबुदाणा दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक खर्च, उत्पादन खर्च वाढल्याने साबुदाणा उत्पादक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून तोटा भरून काढण्यासाठी दरात वाढ करण्यात आल्याचे मार्केट यार्डातील साबुदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabudana price hike by tamil nadu producing companies zws
First published on: 16-05-2022 at 00:14 IST