पिंपरी : महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्हने तयार केलेल्या एसएचजी ई-संकेतस्थळावर (पोर्टल) ‘सक्षमा’ पेज तयार केले आहे. यामुळे स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी महिलांना  व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यांना रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, उपआयुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे यावेळी उपस्थित होते. नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत आठ महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे.

या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले. त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांचे कौतुक केले. या वस्तूंमध्ये स्थानिक, हस्तकलेच्या, उपयुक्त गृहवस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला.

शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत. परंतु, त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागामार्फत शहरातील  सर्व महिलांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे उपायुक्त ममता शिंदे यांनी सांगितले. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या शाश्वत विकासासाठी शाश्वत रोजगार अत्यावश्यक आहे. फेडरेशन निर्मितीद्वारे महिलांना उद्योगशीलतेच्या संधी मिळणार असून समाज विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ई-पोर्टलमुळे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

 महिला फेडरेशनचा सन्मान

अ क्षेत्रीय कार्यालय: संजीवनी फेडरेशन – अध्यक्ष असमा मुलानी, सचिव कविता खराडे, खजिनदार विभा इंगळे

ब : उडान फेडरेशन – अध्यक्ष वर्षा सोनार, सचिव अनिता मठपती, खजिनदार वैशाली घाटके

क : स्वरूपा फेडरेशन – अध्यक्ष सिंधू किवळे, सचिव स्नेहा गिरधारी, खजिनदार संध्या परदेसी

ड : आरंभ फेडरेशन – अध्यक्ष उषा काळे, सचिव मीनल ठेंगे, खजिनदार मीनाक्षी शेट्टीवार

इ : झेप फेडरेशन – अध्यक्ष रेखा सोमवंशी, सचिव संगीता सस्ते, खजिनदार उर्मिला वाकचौरे

फ : एकता फेडरेशन – अध्यक्ष उमा साळवीकर, सचिव रेश्मा घुले, खजिनदार कमल सोनवणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग : गरुड झेप फेडरेशन – अध्यक्ष माधुरी भोसले, सचिव सुवर्णा सोनवळकर, खजिनदार लता गायकवाड ह क्षेत्रीय कार्यालय : अल्फा फेडरेशन – अध्यक्ष कोमल गावधनकर, सचिव राखी धार, खजिनदार रचना वारे