पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीस लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तारखा मागत असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सात्यकी सावरकर यांच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात केली. राहुल गांधी यांच्या वकिलांकडून याबाबत २८ मे रोजी म्हणणे मांडण्यात येणार आहे.

गांधी वारंवार तारखा मागत असल्याने खटल्याच्या सुनावणीत अडथळे निर्माण होत आहे. खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मागणार नाही, तसेच खटल्याच्या प्रत्येक तारखेला गांधी यांचे वकील उपस्थित राहणार आहे, या अटींवर न्यायालयाने गांधी यांना मंजूर करण्यात आला आहे. या अटींचे उल्लंघन करण्यात येत असल्याने गांधी यांचा जामीन रद्द करून मुचलका जप्त करण्यात यावा. गांधी न्यायालयात उपस्थित राहतील, हे निश्चित करावे, असा अर्ज सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला. या अर्जावर त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार हे पुढील सुनावणीस म्हणणे मांडणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात अनिवासी भारतीयांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. सावरकर यांचे नातू सात्यकी यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता.