सव्र्हरच्या अडचणींवर विद्यापीठाचा उपाय
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाइन परीक्षेत मंगळवारी पुन्हा सव्र्हरची अडचण उद्भवली. त्यामुळे काही काळासाठी परीक्षा थांबवावी लागली. या अडचणीवर उपाय म्हणून विद्यापीठाकडून रात्री अकरापर्यंत परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी सुटणार कधी, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत.
विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी के लेल्या एकूण १ लाख ७० हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ५४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी मंगळवारी ऑनलाइन परीक्षा दिली.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले की, मंगळवारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाख ७० हजारांच्या दरम्यान होती. सकाळी ६६ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉगइन केल्याने सव्र्हरची तांत्रिक अडचण झाली. त्यामुळे विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांची परीक्षा पुढील सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक समस्यांमुळे परीक्षा देण्यात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध केली .
अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न
अभियांत्रिकीच्या पीडीडी विषयाच्या परीक्षांत निम्म्याहून अधिक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याने प्रश्नपत्रिका सोडवता आली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने घाईने प्रश्न सोडून प्रश्नपत्रिका सबमिट के ल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.तांत्रिक अडचणींसहअभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.
