लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे शास्त्र किंवा औषधनिर्माण शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शनिवारी (३१ ऑगस्ट) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
गणित, भौतिक शास्त्र, सांख्यिकी, संगणकशास्त्र, काँप्युटर अॅप्लिकेशन, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अॅनिमेशन अँड मल्टिमीडिया आणि औषधनिर्माणशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार असून या विद्यार्थिनींनी चालू शैक्षणिक वर्षांत पदवीच्या पहिल्या वर्षांला पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अपेक्षित आहे. अर्जदारांची निवड त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून असणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी इच्छुकांनी ३१ ऑगस्टपर्यंत ‘सी ५८ अभिमानश्री सोसायटी, बाणेर रस्ता, आयसीआयसीआय डायरेक्ट समोर, पुणे ४११००८’ या पत्त्यावर अर्ज पाठवावेत, असे संस्थेतर्फे कळवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या ८६०५८६१६५७, ०२०- ६५२९२७२१ या दूरध्वनी क्रमांकांवर अथवा ६६६.’्र’ंस्र्ल्लं६ं’’ंऋ४ल्लिं३्रल्ल.ूे या संकेतस्थळावर संपर्क साधावा.