पिंपरी- चिंचवड: दबावतंत्र वापरून शहराध्यक्ष पद मिळालं नाही. गेल्या अकरा वर्षांपासून भाजपच निष्ठेने काम करत असल्याने शहराध्यक्ष पद मिळाल्याच नवनिर्वाचित भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी म्हटलं आहे. आमदार शंकर जगताप यांचा यात मोठा हातभार असल्याचं सांगायला शत्रुघ्न काटे विसरले नाहीत. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

चिंचवड विधानसभेच्या वेळी एक नाराज गट घेऊन आमदार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी विरोध केला होता. काटे यांची समजूत काढून आणि शहराध्यक्ष पदाचा शब्द देऊन त्यांना शांत केलं होतं. अखेर शत्रुघ्न काटे यांना शहराध्यक्ष पद मिळाल आहे. पण, पक्षावर दबावतंत्र वापरल्याने त्यांना शहराध्यक्ष पद मिळाल्याची चर्चा आहे. यावर शत्रुघ्न काटे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. भाजपमध्ये दबावतंत्र चालत नाही. गटबाजी चालत नाही. मी कुठलंही दबावतंत्र वापरून शहराध्यक्ष पद मिळवलं नाही. गेल्या अकरा वर्षांपासून पक्ष निष्ठेमुळे मला शहराध्यक्ष पद मिळाल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं आहे. वरिष्ठ पातळीवर मला न्याय मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात आमदार शंकर जगताप यांचा मोठा हातभार असल्याचं काटे म्हणाले. चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक होतो. इच्छुक असणं गैर नाही. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. अस ही काटे म्हणाले. आम्ही शंकर जगताप यांना चिंचवड विधानसभेतून एक लाखांचा मताधिक्याने विजयी केलं आहे. आमदार शंकर जगताप यांनी दिलेला शब्द पाळला आहे. आमच्यात राजकीय मतभेद होते. मनभेद कधी ही नव्हते. भाजप ही भारतातील मोठी संघटना आहे. भाजप संघटनेचे शहराध्यक्ष पद मिळाल्याने वरिष्ठांचे आभार मानतो. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत. महायुती की स्वबळावर आगामी महानगर पालिका लढवायची आहे. हे वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. पण, आम्ही १२८ जागांवर लढण्याची तयारी केल्याचं शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं आहे.