Uddhav Thackeray, IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात कुंकू पुसलं गेलेल्या माताभगिनींचा आक्रोश थांबला नसताना अबुधाबी येथे आज, होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याला केंद्र सरकारने परवानगी दिली. केंद्र सरकारविरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने ‘माझं कुंकू, माझा देश’ राज्यव्यापी आंदोलन पुरारले आहे. या आंदोलनावर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन टीका केली आहे.“धर्म विचारून गोळ्या घातल्या, कितीतरींचे संसार उजाडले…सारा देश ढवळून निघाला होता. हे मात्र त्यावेळी युरोप टूर करायला गेले आणि म्हणे सिंदूर विरोधी बोलणार” अशी टीका उद्धव ठाकरेंवर म्हस्के यांनी केली आहे.
अबुधाबी येथे आज भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच क्रिकेट सामना होणार आहे. परंतू, पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खातमा केला होता. परंतू, पहलगाम हल्ल्यात कुंकू पुसलं गेलेल्या महिलांचा आक्रोश थांबलेला नसताना, केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी कशी दिली असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तर, केंद्र सरकारविरोधात शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने ‘माझं कुंकू, माझा देश’ राज्यव्यापी आंदोलन पुरारले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडत आहे. असे असतानाच, शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी एक्स अकाऊंटवर कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
…आणि म्हणे सिंदूरला विरोध करणार- म्हस्के
धर्म विचारून गोळ्या घातल्या कितीतरींचे संसार उजाडले…
सारा देश ढवळून निघाला होता हे मात्र त्यावेळी युरोप दूर करायला गेले आणि म्हणे सिंदूर विरोधी बोलणार
डोंबिवलीतले तीन परिवार त्या हल्ल्यात कर्त्या पुरुषाना गमावून बसले
ना यांना ते परिवार दिसले ना यांनी जबाबदारीने काही अंगावर घेतले
धर्म विचारून गोळ्या घातल्या
— Naresh Mhaske (@nareshmhaske) September 14, 2025
कितीतरींचे संसार उजाडले…
सारा देश ढवळून निघाला होता हे मात्र त्यावेळी युरोप दूर करायला गेले आणि म्हणे सिंदूर विरोधी बोलणार
डोंबिवलीतले तीन परिवार त्या हल्ल्यात कर्त्या पुरुषाना गमावून बसले
ना यांना ते परिवार दिसले ना यांनी जबाबदारीने काही… pic.twitter.com/SXub140NeQ
…आणि म्हणे ऑपरेशन सिंदूरला विरोध करणार
काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ले होत असताना भारत पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळला
पुन्हा पुन्हा दहशतवाद्यांच्या हातून माझा देश पोळला
तेव्हा यांचं रक्त उसळत नाही रक्त काय, तोंडावरची माशी देखील उडत नाही
आणि म्हणे सिंदूरला विरोध करणार
तुमची धाव मातोश्रीच्या कुंपणापर्यंतच
आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या फंदात तुम्ही पडू नका
आपल्या आवाक्याबाहेरचे विषय उगा जीवाला लावून घेऊ नका
मुंबई महापालिका वाचवण्याचे यांचे वांदे
…आणि म्हणे सिंदूरला विरोध करणार
उद्धवजी, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश खंबीर आहे
देशाच्या सुरक्षेबाबत आमचं सरकार गंभीर आहेत
यामुळे काळजी करू नका. तुम्ही आपले काँग्रेसचे लांगुलचालन सुरू ठेवा.
तिथे इंडि आघाडीतली तुमची किंमत बघितली देशान
…. म्हणे सिंदूर ला विरोध करणार