पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर वाचला. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. उद्योग कोणामुळे राज्याबाहेर गेले, याबाबत आम्ही श्वेतपत्रिका काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहरातील लघुउद्योजकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मोशी संतनगर येथे उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत लघुउद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, जयंत कड, अजय भोसले, प्रविण लोंढे आदी लघुउद्योजक उपस्थित होते.

आमदार लांडगे व लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष बेलसरे यांनी उद्योजकांच्या विविध समस्यांची माहिती उद्योगमंत्र्यांना यावेळी दिली. त्याचा संदर्भ देऊन सामंतांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन यावेळी दिले. सामंत म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत भंगाराची दुकाने हटवण्यात यावीत. महावितरणने उद्योगांची वीज वारंवार खंडित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. उद्योगांच्या वीज तोडणीबाबत नियमावली कडक करण्यात येईल. लघु उद्योजकांची सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी शासन प्रत्नशील राहील, असे ते म्हणाले. शास्तीकर, मिळकत कर, रेडझोन बाबतच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा: “छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८ लाखांची मदत
पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ८ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.