पुणे : माहिती- तंत्रज्ञान किंवा विज्ञान क्षेत्रातील घोडदौड असो, की उंचावलेल्या आर्थिक स्तरामुळे जीवनशैलीला लाभलेले आधुनिक परिमाण असो, आपल्या समाजात डावखुऱ्यांचे स्थान आजही डावेच आहे, हे वास्तव आहे. त्यामुळेच घरातील कोणी व्यक्ती, विशेषत: आपले मूल डावखुरे असेल तर त्याचे डावखुरेपण स्वीकारणे आजही आई-वडिलांना अवघड जाते. त्यातून त्याला उजखुरे करण्याचा अट्टहास घडतो. एवढेच कशाला, विवाहेच्छूंचे विवाह जमतानाही त्यांचे डावखुरे असणे आड येते, हे तुम्हाला माहितीये का?

शनिवारी (१३ ऑगस्ट) असोसिएशन ऑफ लेफ्ट-हँडर्सतर्फे ‘जागतिक डावखुरे दिन’ साजरा केला जात आहे. ‘डावे-उजवे असे काही नसते, हे सगळे आपल्या मनाचे गैरसमज आहेत. त्यामुळे डावखुऱ्या मुलांना बळजबरीने उजखुरे करू नका. दोन्ही हातांना सारखंच महत्त्व द्या,’ अशी जागृती करून यंदा हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जागतिक डावखुरे दिनानिमित्त जगभरात ३० सप्टेंबपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे अध्यक्ष बिपिनचंद्र चौगुले यांनी दिली. चौगुले म्हणाले,की डावे म्हणजे दुय्यम किंवा गौण नाही. माणसाच्या उजव्या हाताप्रमाणे डावा हात देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जेवण, लेखन, पूजा, प्रसाद आणि खेळ यासाठी डावा हात वापरणे पूर्णपणे नैसर्गिक, सामान्य आणि आरोग्यदायी असते. त्यामुळे डाव्या हाताच्या वापराला मज्जाव करू नये, या विषयावर प्रबोधन करत राहण्याची आवश्यकता असल्याचे चौगुले स्पष्ट करतात.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

आज दिवस..

जगाच्या पाठीवर सुमारे १० ते १२ टक्के लोकसंख्या डावखुरी आहे. त्यांना उजखुरे करण्याचा अट्टहास नको, त्यांना नैसर्गिकपणे जगू द्या, या मागणीसाठी गेली तीन दशके असोसिएशन ऑफ लेफ्ट-हँडर्स ही संस्था कार्यरत आहे. आज जागतिक डावखुरे दिनानिमित्त संस्था जनजागृती उपक्रम राबवणार आहे.

अडचणी कोणत्या?

’कात्रीची रचना उजखुऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने केलेली असल्याने डावखुऱ्या व्यक्तीला हातात कात्री घेऊन कागद कापता येत नाही.

’शाळेतील विद्यार्थी उजव्या हातात पेन्सिल आणि डाव्या हातामध्ये टोकयंत्र घेऊन पेन्सिलला टोक करू शकतात. पण, हे डावखुऱ्या मुलाला शक्य होत नाही.

’संगणकाच्या ‘माउस’ची रचनाही उजखुऱ्या हाताच्या व्यक्तीसाठी केली आहे. डावखुऱ्या व्यक्तीला ‘की’ बदलल्याशिवाय काम करणे अवघड जाते आणि त्याला वेळ बराच द्यावा लागतो.