महापालिकेच्या विद्युत विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या कारभारामुळे सहकारनगर परिसरासह पुण्याच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण पुण्याच्या अनेक भागात पाणी येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर विद्युत विभाग आणि पाणीपुरवठा विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. मात्र, अपुऱ्या होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: उधळपट्टीचा सायकल मार्ग ! सिंहगड रस्ता ते हडपसर नवीन मार्ग प्रस्तावित; ६६ कोटींचा खर्च अपेक्षित

पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, संपूर्ण सहकार नगर, अरण्येश्वर, संभाजीनगर, तळजाई परिसर, बिबेवाडी परिसर, मार्केट यार्ड परिसर भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठ्यास सामोरे जावे लागत आहे.दरम्यान पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनीही पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची कबुली दिली असून पाणापुरवठा तातडीने सुरळीत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे, अशी माहिती माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे: कोव्हिशिल्डची अद्याप प्रतीक्षा; कोव्हॅक्सिन लशीचा पुरेसा साठा

विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी सहकारनगरसह अन्य भागाला पाणीपुरवठा होणार नसल्याची तसेच शनिवारी रात्रीपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती स्थानिक पाणीपुरवठा विभागाकडून माजी स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली होती. मात्र शनिवारपासून मंगळवार पर्यंत अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे. जेमतेम काही मिनिटेच पाणीपुरवठा होत असल्याच्या शेकडो तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. विद्युत विभाग आणि पाणीपुरठा विभागाकडून अपु-या पाणीपुरवठयाची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यात येत आहे. मात्र, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत असून पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South pune water supply disrupted pune print news apk13 amy
First published on: 27-12-2022 at 12:49 IST