सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाला गती

सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.

११८ कोटींची निविदा मंजूर; वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी निर्णय

पुणे :  सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली ११८ कोटींची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महापालिके च्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंगळवारी मान्यता दिली. उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामांना गती मिळणार आहे.

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. त्यासाठी २०२८-१९ या आर्थिक वर्षांसाठी १० कोटी मंजूर करण्यात आले होते. कामासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली होती. सल्लागाराने उड्डाणपूल बांधण्याचे चार पर्याय सुचविले होते. त्यापैकी राजाराम पूल ते फन टाईम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

उड्डाणपुलाच्या कामासाठी यापूर्वी दोन वेळा पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले होते. तांत्रिक छाननी समितीनेही त्याला मान्यता दिली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र करोना संसर्गामुळे निविदा प्रक्रियांना प्रतिसाद मिळाला नाही. मुदतवाढीनंतर चढय़ा दराने निविदा आल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जून महिन्यात उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद महापालिके ने मंजूर के ली होती.

आता निविदा प्रक्रियेला मंजुरी दिल्याने सिंहगड  रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित उड्डाण पुलाची लांबी एकू ण २.५ किलोमीटर एवढी आहे. दोन टप्प्यात उड्डाण पूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कु ठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. महापालिके च्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखडय़ानुसार उड्डाण पुलासाठी १३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

२.७४ किलोमीटर अंतरात थेट वाहतूक

या रस्त्यावरून दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार पर्यायी नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल चौकात ४९५ मीटर लांबीचा आणि सिंहगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृहापर्यंत २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी पुलाची रुंदी १६.३ मीटर आणि एके री वाहतुकीसाठी पुलाची रुंदी ८.१५० मीटर एवढी आहे. भविष्यकाळात मेट्रो मार्गिके चा विचार करून आवश्यक

ती जागा ठेवण्यात येणार आहे. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे २.७४ किलमीटर अंतराची वाहतूक थेट होणार आहे.

उड्डाण पुलाची रचना

विठ्ठलवाडी ते फनटाइन चित्रपटगृह (वडगांव धायरीकडे जाण्यासाठी)

इंडियन ह्य़ूम पाइप ते भारत पेट्रोलियम-हिंगणे (स्वारगेटकडे येण्यासाठी)

विठ्ठलवाडी ते बाजी पासलकर उड्डाण पूल (स्वारगेटकडे येण्यासाठी)

सिंहगड रस्ता उड्डाणपूल (संकल्पचित्र)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Speed flyover sinhagad road pune ssh

ताज्या बातम्या