वाई: पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी रात्री साडेनऊ वाजता उडतारे गावच्या हद्दीत आनेवाडी टोलनाक्या जवळ चालत्या एसटीने पेट घेतल्याने खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही. साताऱ्याहून पुणे कडे जाणारी एसटी बस जात होती. अचानक वाहनातून धूर येऊ लागल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर फक्त काही मिनिटांत संपूर्ण एसटी बसने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की एसटी जळून भस्मसात झाली. या सर्व घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. या घटनेत जीवित हानी झालेली मात्र एसटी मधील प्रवासी सुखरूप आहेत.भुईंज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.