पुणे : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नियमावली जाहीर केली असून त्यासाठी कोणताही अर्ज भरून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्रही दाखवावे लागणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (१९ मे) दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या नोटा मंगळवार, २३ मेपासून सर्व बँका अथवा रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये बदलून मिळणार आहेत. नोटा बदलून देण्यासाठी बँकांकडून अर्ज भरून घेतला जाणार असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने नोटा बदलण्याबाबत नियमावली जाहीर केली असून असा कोणताही अर्ज लिहून घेतला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबत स्टेट बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक एस. मुरलीधरन यांनी स्पष्ट केले की, बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये येऊन नागरिक नोटा बदलून घेऊ शकतात. त्यासाठी एका वेळी २० हजार रुपयांची मर्यादा आहे. नागरिकांकडून बँक कोणताही अर्ज लिहून घेणार नाही. त्याबरोबरच नोटा बदलताना संबंधित नागरिकाच्या ओळखीचा कोणताही पुरावा मागितला जाणार नाही.

stray dogs, Nagpur,
मोकाट श्वानांचा त्रास; व्यवस्थापनासाठी नागपूर महापालिका
reserve bank
सोने तारण कर्जाचे रोखीत वितरण २०,००० रुपयांच्या मर्यादेपर्यंतच ;वित्तीय कंपन्यांना काटेकोर पालनाचे रिझर्व्ह बँकेचे निर्देश
mumbai municipal corporation seizes six motor garages for non payment of property tax
मालमत्ता कर न भरणाऱ्या सहा मोटार गॅरेजवर जप्तीच मालमत्ता करवसुलीसाठी महानगरपालिकेकडून कठोर कारवाईला सुरुवात
tbo tek sets price band at rs 875 to 920 per share
टीबीओ टेकची प्रत्येकी ८७५ ते ९२० रुपयांना भागविक्री
npci bank of namibia sign an agreement to develop upi like system
नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
thane, municipal corporation, tax relief scheme, thane citizens
ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना, दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत
Take concrete steps to house remaining mill workers demand of mill workers on Labor Day
मुंबई : उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, कामगार दिनी गिरणी कामगारांची मागणी
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी

बँकांमध्ये आधीच गर्दी

नागरिकांना दोन हजारच्या नोटा २३ मेपासून बदलून घेता येतील, असे रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच जाहीर केले. तरीही शनिवारी (२० मे) अनेकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसले. ग्राहकांची समजूत काढून त्यांना परत पाठविण्याचे काम बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना करावे लागले.

चलनातील नोटा

मार्च २०१८ मध्ये ६.७३ लाख कोटी
मार्च २०२३ मध्ये ३.६२ लाख कोटी
वितरणातील चलनात सध्या प्रमाण १०.८%