पुणे : आषाढी पायी वारी सोहळा आळंदी आणि देहूतून मार्गस्थ होत असताना पालख्यांचे स्वागत ध्वनिवर्धकांच्या दणदणाटात केले जाऊ नये, अशी मागणी आळंदी, देहू देवस्थान आणि वारकऱ्यांकडून गुरुवारी करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत ही मागणी करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दींपासून पुण्याच्या ग्रामीण हद्दीपर्यंत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी, विसाव्याच्या ठिकाणी मोठ्या  आवाजात ध्वनिवर्धक लावले जातात. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली.

हेही वाचा >>> यंदाचा गाळप हंगाम संपला; किती टन साखर उत्पादन?

Aditya Thackeray and MLA Ashish Shelar
मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार; आमदार आशिष शेलार यांचा आरोप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता
BJP Navi Mumbai, Navi Mumbai Eknath Shinde,
नवी मुंबईत शिंदे समर्थकांच्या अभियानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
Paper Pulp Ganesha Idols
कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती! वजनदार मूर्तींना पर्याय; गिरगावातील सार्वजनिक मंडळांचा पर्यावरणपूरक उत्सवासाठी पुढाकार
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?

पालखी मार्गावरून सोहळा मार्गस्थ होत असताना शहरांच्या हद्दी, गावातील वेशींच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात स्वागत कमानी उभारून पालख्यांचे स्वागत करण्यात येते. परंतु, या ठिकाणी रस्ते, महामार्गांच्या कडेला, विसाव्याजवळ असलेल्या ठिकाणी ध्वनिवर्धकांच्या भिंती उभारून मोठ्या आवाजात गाणे, घोषणा दिल्या जातात. त्यामुळे वारीच्या भक्तीमय सोहळ्यात आरत्या, भजन, कीर्तने, विठ्ठल नामाचा जयघोष सुरू असताना या आवाजामुळे विघ्न येते. विशेषत: वारीमध्ये ज्येष्ठ आणि महिला वारकऱ्यांची संख्या  जास्त असल्याने आवाजामुळे त्रास झाल्याच्या घटना घडल्या असून अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कारवाई झाली नसल्याचे देवस्थानांचे पदाधिकारी आणि वारकरी मंडळांनी सांगितले.

हेही वाचा >>> …तर रद्द होणार आरटीईअंतर्गत प्रवेश! शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तातडीने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात मार्गस्थ होण्यासाठी ध्वनिवर्धकांच्या आवाजांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी ध्वनिवर्धक लावले जातात. त्यामुळे भक्तीमय वातावरणावर परिणाम होत असून वारकऱ्यांना आवाजाचा त्रास होत आहे. तसेच पालखी मार्गांच्या ठिकाणावर सुरू असणाऱ्या विकास कामांचा राडारोडा काढणे, इंद्रायणी नदीत जलपर्णी काढावी, मैलामिश्रीत पाणी नदीत सोडू नये, दर्शनबारी-मंडप रांगेची समस्या दूर करावी, रस्ता रुंदीकरण अशा मागण्या केल्याची माहिती वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष डी.भोसले-पाटील यांनी दिली.