scorecardresearch

पुणे : येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपीच्या आत्महत्या करण्याच्या मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही

Suicide by hanging of a prisoner in Yerawada Jail

पुण्यातील येरवडा कारागृहातील एका कैद्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणेश जगन्नाथ तांबे (५३) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी गणेश जगन्नाथ तांबे हा येरवडा कारागृहात २०१० च्या खुनाच्या गुन्ह्यात खुल्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगत होता. गुरुवारी दुपारी बराक क्रमांक दोन येथील स्वयंपाकचे काम झाल्यावर, तिथे काही वेळाने गणेश जगताप याने गळफास लावून घेतला.

या घटनेची माहिती मिळताच,डॉक्टरांनी तपासणी केली असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आरोपीच्या आत्महत्या करण्याच्या मागील कारण अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suicide by hanging of a prisoner in yerawada jail abn 97 svk

ताज्या बातम्या