scorecardresearch

पुणे : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीची आत्महत्या; खडकवासला भागातील घटना

कुटुंबीयांच्या विरोध डावलून तरुणीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पुणे : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीची आत्महत्या; खडकवासला भागातील घटना
इचलखडकवासला भागात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीची आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खडकवासला भागात घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. हवेली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.प्रांजल किसन रासकर (वय २२, सध्या रा. खडकवासला, मूळ रा. पिंपळनेर, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे.

हेही वाचा- चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना

कुटुंबीयांच्या विरोध डावलून प्रांजलने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. प्रांजलचा पती कामावरुन घरी आला. पतीने घराचा दरवाजा वाजविला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्याने घरमालकाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रांजलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रांजलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे आढळून आले.

हेही वाचा- पुणे : हरियाणातल्या विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग; सहकारी विद्यार्थीच आरोपी

तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. हवेली पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्मात आली आहे. प्रांजलच्या नातेवाईकांच्या जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 21:37 IST

संबंधित बातम्या