टाटा कॅपिटल आणि सेंटर फॉर एनव्हायव्र्हेमेन्टल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन’ यांच्यातर्फे पहिल्या सोलार पॅनल बसवलेल्या झाडांचा समावेश असलेल्या ‘सूर्य आरण्या’ची स्थापना करण्यात आली आहे. हे आरण्य ठाण्यातील आय-थिंक टेक्नो कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आले आहे.
यामध्ये सहा सोलार पॅनल बसवलेली झाडे आहेत. ही झाडे दिवसभर सूर्याच्या प्रकाशात चार्ज होतील. रात्रीपासून दिवस उजाडेपर्यंत टेक्नो कॅम्पसच्या बागेमधील तसेच आवारातील सुमारे ७५० व्ॉट ऊर्जेचे सर्व दिवे या झाडांच्या मदतीने चालतील. या प्रणालीवर चालणारे आणि कमी वीज लागणारे एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. या झाडांच्या खोडांवर लोप पावत असलेल्या प्राणी किंवा वनस्पतींचे चित्र रेखाटले आहे. हा उपक्रम देशभरात सुरू करण्याचा मानस आहे, असे टाटा सन्सचे डॉ. मुकुंद राजन यांनी सांगितले.