पुणे-लोणावळा रेल्वेत टीसीला एका अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टीसी गणेश जाधव यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेस आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – मंत्रालयाच्या नावावर ‘बार्टी’च्या अधिकाऱ्यांची २१ टक्के वसुली?; प्रशिक्षण केंद्रांच्या चालकांची तक्रार

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
vasai pelhar police marathi news, hit and run vasai latest marathi news
‘हिट ॲण्ड रन’च्या आरोपीला पंजाब मधून अटक, ६० सीसीटीव्ही तपासून पेल्हार पोलिसांची कारवाई
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार

मिळालेल्या माहितीनुसार, टीसी गणेश जाधव हे पुणे-लोणावळा रेल्वेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार टीसी म्हणून कार्यरत होते. रविवारी पुणे-लोणावळा रेल्वेत जाधव हे आपलं कर्तव्य बजावत असताना पुण्याहून लोणावळ्यात रेल्वे दाखल झाली. एका बोगीतून दुसऱ्या बोगीत जात असताना त्यांनी वाटेत उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ”बाजूला हो पुढे जायचं आहे”, असे म्हटले. त्यामुळे मुलाने थेट जाधव यांच्या डोळ्यावर बुक्क्यांचा मारा केला. मार इतका जबदस्त होता की, टीसी जाधव यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर गणेश जाधव ह्यांनी आरोपीला पकडून ठेवत प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलसांनी याबाबत दिली.