पुणे : सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या एकाचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी फेटाळून लावला. करण अर्जुन दळवी (वय २१, रा. वडगाव) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते.

आंबेगाव परिसरातील सिंहगड विधी महाविद्यालयाच्या परिसरातील खाऊ गल्लीत २८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास दळवी आणि त्याच्या बरोबर असलेला अल्पवयीन साथीदार आले. त्यांनी कोयते उगारुन दहशत माजविली. खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांची तोडफोड केली. वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली होती.

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

हेही वाचा >>> पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

आरोपी दळवी आणि अल्पवयीन साथीदाराने महाविद्यालयीन विद्यार्थी अथर्व लांडगे (वय २०) याच्यावर कोयत्याने वार केला. अथर्वचा मित्र तन्मय ठोंबरे याला प्लॅस्टिकचा स्टूल फेकून मारला. सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरात दहशत माजविल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी एकाला पकडून चोप देला होता. आरोपी दळवी पसार झाला होता. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा >>> कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा! लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी

 या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी दळवी याने अर्ज सादर केला होता. सरकारी वकील जावेद खान यांनी जामीन अर्जास विरोध केला. आरोपी दळवी जामिनावर बाहेर आल्यास पुन्हा दहशत माजविण्याचा गुन्हा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. खान यांनी युक्तीवादात केला. न्यायालयाने दळवी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.