दी पूना र्मचट्स चेंबर्सतर्फे उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ यंदा राज्यस्तरावर आदित्य बिल्डर्सचे संस्थापक संचालक केवलचंद कटारिया, पुणे जिल्हा व शहर स्तरावर जयहिंद कलेक्शनचे संस्थापक नागराज जैन आणि सभासद स्तरावर सी.एच. सुगंधी अॅण्ड सन्सचे संस्थापक भगवानदास सुगंधी यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच, वीरेन गावडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती चेंबर्सचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार १३ ऑगस्ट रोजी पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. समारंभात अध्यक्ष म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 6th Aug 2015 रोजी प्रकाशित
विनायक करमरकर यांच्यासह चौघांना दी पूना र्मचट्स चेंबर्सचे पुरस्कार जाहीर
‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ ‘लोकसत्ता’चे बातमीदार विनायक करमरकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती चेंबर्सचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First published on: 06-08-2015 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The poona merchants chambers rewards declared