महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धस्थान असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी मंदिर सोमवार पासून भाविकांसाठी खुलं होणार आहे. सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. मात्र कोविड चा प्रादुर्भाव पाहता भाविकांना मास्क, सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून  महाराष्ट्रातील मंदिरं बंद होती. अखेर भाविकांच्या मागणीनंतर आणि विरोधकांच्या आंदोलनानंतर ठाकरे सरकारने मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला असून सोमवार पासून भाविकांना मंदिरांची दारं उघडली जाणार आहेत. आळंदीमधील माऊलींच मंदिर देखील खुले होणार असून यासाठी विशेष दक्षता आळंदी मंदिर प्रशासनाने घेतली आहे. श्री ज्ञानोबारायांच्या मंदिर परिसरात असणाऱ्या दर्शनबारीमधून प्रवेश कणाऱ्या भाविक भक्तांना शक्य तितक्या जवळून श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळावा या दृष्टीने पंखामंडपातून श्रींचे दुरून दर्शन घेऊन पाणदरवाजातून मंदिराच्या बाहेर पडावे अशी रचना करण्यात आलेली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The temple of dnyaneshwar mauli in alandi will be open from tomorrow scj 81 kjp
First published on: 15-11-2020 at 12:39 IST