पुणे : रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना लुटणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून आठ मोबाईल संच जप्त करण्यात आले.

सजाद मोहम्मद हनीफ शेख (वय ४२ , रा. कामशेत, सध्या रा.लोहीयानगर पेट्रोल पंपाजवळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिवाजी रस्त्यावरून जाणाऱ्या मध्यरात्री एकाला अडवून शेखने त्याच्याकडील मोबाईल संच हिसकावून नेला होता. पोलिसांच्या पथकाकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. शेख सराइत चोरटा आहे. तो मंडई परिसरात थांबल्याची माहिती खडक पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. सापळा लावून त्याला पकडण्यात आले. चौकशीत त्याने रात्री जाणाऱ्या पादचाऱ्यांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल संच हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ मोबाईल संच जप्त करण्यात आले.

हेही वाचा – आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढणार? खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, “एखादा मतदारसंघ म्हणजे..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राकेश जाधव, अजीज बेग, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, रफिक नदाफ आदींनी ही कारवाई केली.