पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटी शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी फोडली आणि त्यातील रोख रक्कम चोरुन नेली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवार पेठ परीसरात असलेल्या पासोड्या विठोबा मंदिरात आज पहाटेच्या सुमारास मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले. त्यावेळी मंदिरातील दरवाजा त्यांना तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले तर दानपेटीमधील पैसे चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटे दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावर गेले आणि त्यानंतर दानपेटी फोडली.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.