मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर आज (गुरूवार) सकाळच्या सुमारास दोन अपघात झाले. या दोन्ही अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील भाताण बोगद्यानजीक मुंबईकडे जाणाऱ्या सँट्रो कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात कारमधील चार प्रवासी जखमी झाले. यातील दोन प्रवासी हे गंभीर जखमी आहेत.
तर दुसरा अपघात रसायनी हद्दीत झाला. मुंबईकडे जाणारी भरधाव इको कार अचानक उलटली. यात दोघे जखमी झाले. या कारमध्ये डुकरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे समजते. कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. घटनास्थळी पोलीस व महामार्गाचे कर्मचाऱ्यानी लगेच धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस तपास करत असून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two accident on mumbai pune express way 6 injured
First published on: 19-01-2017 at 09:19 IST