scorecardresearch

पुणे : पीएमपी प्रवासात महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली.

पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली.

याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला भोसरीत राहायला आहे. ती हडपसरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पीएमपी बसने जात होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दोन लाख ६५ हजारांचे दागिने लांबविले. मगरपट्टा थांब्यावर महिला बसमधून उतरली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two and half lakh jewelery of a woman on pmp trip pune print amy

ताज्या बातम्या