पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने नाशिक, बुलढाणा येथून दोन दलालांना अटक केली.
दीपक विक्रम भुसारी (वय ३२, रा. अयोध्यानगर, बुलढाणा), राजेंद्र विनायक सोळुंके (वय ५२, रा. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत. टीईटी गैरव्यवहार प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यां ना दिल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील सात हजार ८०० अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासात मिळालेल्या माहितीनुसार दलाल भुसारी आणि सोळुंके यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक