नव्या उमेदीने प्रायोगिक नाट्य संस्था, कलाकार, लेखक, दिग्दर्शक पुढे सरसावले

पुणे :  करोना निर्बंधांनंतर सुरू झालेली नाट्यगृहे आणि दिवाळी संपल्यानंतर शहरात प्रायोगिक नाटकांच्या दोन महोत्सवांची पर्वणी रसिकांना शुक्रवारपासून (१२ नोव्हेंबर) तीन दिवस अनुभवता येणार आहे. राज्य शासनाने २२ ऑक्टोबर रोजी सर्व नाट्यगृहे खुली केली. व्यावसायिक रंगभूमीप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीलाही या बंदचा फटका बसला आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

परंतु, आता पुन्हा नव्या उमेदीने प्रायोगिक नाट्य संस्था, कलाकार, लेखक, दिग्दर्शक पुढे सरसावले आहेत आणि नवीन कल्पना घेऊन संस्था कामाला लागल्या आहेत.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरने उत्कृष्ट साहित्यकृतींवर आधारित नवीन नाटकांची निर्मिती करून तीनही नाटकांचा ‘अनलॉक फेस्टिवल’ करण्याचे योजिले आहे. रमेश इंगळे उत्रादकर यांच्या सर्व प्रश्न अनिवार्य या कादंबरीची रंगावृत्ती याच नावाने कृतार्थ शेवगावकर याने तयार केली असून अपूर्व साठे ती दिग्दर्शित करत आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या प्रदक्षिणा या कथेवर आधारित अनुदिन अनुतापे हा दीर्घांक प्रमोद काळे यांनी लिहिला असून दिग्दर्शनही करत आहेत.

नील सायमनच्या प्रिझनर्स ऑफ सेकंड अ‍ॅव्हेन्यू यावर आधारित एरर कोड १००५  हे नाटक सचिन जोशी दिग्दर्शित करत असून रुपांतर अपूर्व साठे यांनी केले आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ३० कलाकार या नाटकांमध्ये  काम करत आहेत. संस्थेच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात शुक्रवारपासून तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन रमेश इंगळे ऊत्रादकर यांच्या हस्ते सायंकाळी सात वाजता होणार आहे.

आयपार नाट्यमहोत्सव  आयपार नाट्यमहोत्सव शुक्रवारपासून (१२ नोव्हेंबर) सुरू होत आहे. या महो्त्सवातील चार नाट्यप्रयोग शुक्रवार ते रविवारपर्यंत कर्वे रस्त्यावरील द बॉक्स येथे होणार आहे. त्यासाठी http://festival.iapar.in/booking/ संकेतस्थळावर तिकीटविक्री सुरू आहे. महोत्सवातील काही प्रयोग प्रत्यक्ष नाट्यगृहात होणार आहेत तर अनेक कार्यशाळा आणि इतर उपक्रम ऑनलाइन होणार आहेत. महोत्सवाच्या अधिक महितीसाठी ७७७५०५२७१९ या क्रमांकावर किंवा http://festival.iapar.in/booking/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.