पुणे : ‘सीएमई’मध्ये सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू, पाच जखमी

तसेच पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत.

सीएमई (संग्रहित छायाचित्र)
पुण्यातील दोपोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) पूल बांधणीच्या सरावादरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये जेसीओ दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

मृत जवानांपैकी केरळचे रहिवासी असलेले संजीवन पी. के. असे एका जवानाचे नाव असून दुसऱ्या जवानाचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. केबल्सच्या सहाय्याने दोन टॉवरदरम्यान उभारण्यात आलेला पूल उघडण्याच्या प्रशिक्षणादरम्यान एक टॉवर अचानक कोसळला. या भीषण अपघातात टॉवरखाली नऊ सैनिक अडकून पडले यांपैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, असे जागरण या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

युद्ध काळात लष्कराला मार्ग तयार करुन देण्यासाठी पूल उभारणे आणि इतर अभियांत्रिकीची कामे सीएमईतून जवानांना शिकवली जातात. यासाठी दररोजचा सराव कार्यक्रमही तयार करण्यात आलेला असतो. अशाच एका सरावादरम्यान गुरुवारी ही दुर्घटना घडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Two indian army soldiers have lost their lives at college of military engineering pune aau