कात्रज परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले.कात्रजमधील शनी मंदिरासमोर भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोवर्धन उत्तम शिंदे (वय ३७, रा. विजयलक्ष्मी अपार्टमेंट, आगम मंदिर पायथा, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार शिंदे भरधाव वेगाने मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास कात्रजमधील शनी मंदिर परिसरातून जात होता. भरधाव दुचाकी घसरून दुचाकीस्वार शिंदे गंभीर जखमी झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिंदेचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस हवालदार कचरे तपास करत आहेत.

कात्रज चौकातील स्मशानभूमीजवळ झालेल्या आणखी एका अपघातात दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रमोद गंगाधर छकडे (वय ३०, रा. टिळेकरनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी शिवराम कैलास मराठे (वय २६) आणि राहुल तुकाराम खरात (वय ३४) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीस्वार प्रमोद आणि त्याचे मित्र शिवराम आणि राहुल कात्रज चौकातील स्मशानभूमी परिसरातून जात होते. त्या वेळी दुचाकी घसरुन अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार प्रमोद गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार