तुकडाबंदी, रेरा कायद्याचे पालन न करता उभारलेल्या मालमत्ता अनधिकृत

पुण्यात या पथकाने केलेल्या तपासणीत ८३० दस्त बेकायदा नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे

कायद्याचे उल्लंघन करून केलेल्या दस्तांची तपासणी

पुणे : तुकडाबंदी आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या कायद्यांची अंमलबजावणी न करता राज्यात उभारण्यात आलेल्या मालमत्तांची दस्तनोंदणी रद्द के ली जाणार नाही. मात्र, संबंधित मालमत्ता अनधिकृत ठरवण्यात येणार आहेत. परिणामी, संबंधित मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नसल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने स्पष्ट के ले आहे.

पुण्यात रेरा कायद्याचे उल्लंघन करून १९५ दस्तांची नोंदणी केल्याचे तसेच तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी न करता ६३५ दस्त सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १४ या कार्यालयात नोंदण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी प्रभारी सह दुय्यम निबंधक एल. ए. भोसले यांना नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबित के ले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात रेरा आणि तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून के लेल्या दस्तांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

याबाबत नोंदणी महानिरीक्षक हर्डीकर म्हणाले, ‘रेरा आणि तुकडाबंदी कायद्याचे पालन न करता झालेल्या दस्तांच्या तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. पुण्यात या पथकाने केलेल्या तपासणीत ८३० दस्त बेकायदा नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित दस्त रद्द केले जाणार नाहीत.

मात्र, त्या मालमत्ता अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत. पुण्याप्रमाणेच राज्यात अशा प्रकारच्या दस्तांची नोंदणी झाली असल्यास त्या मालमत्ता अनधिकृत ठरवल्या जाणार आहेत. महापालिका किं वा स्थानिक प्रशासनाकडून त्या मालमत्तांवर कारवाई होऊ शकते. रेरा आणि तुकडाबंदी कायद्यांचे पालन करण्याबाबतच्या सूचना सर्व दुय्यम निबंधक आणि सहायक दुय्यम निबंधक कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.’

दस्त नोंदणीसाठी

रेरा कायद्यातील तरतुदीनुसार ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्प किं वा बांधकाम प्रकल्पांमध्ये आठपेक्षा जास्त सदनिका असल्यास संबंधित प्रकल्पाची नोंदणी महारेरा प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक आहे. महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी के ली नसल्यास संबंधित प्रकल्पातील सदनिकांची दस्त नोंदणी करण्यात येत नाही. तुकडाबंदी कायद्यानुसार शेतजमिनींचे हस्तांतर करताना जमिनीचा तुकडा न पाडण्याचे बंधन आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किं वा सक्षम प्राधिकारी यांची पूर्वपरवानगी, ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी दस्तांची नोंद करू नये, अशीही अट आहे.

महारेराकडे नोंदणी नसलेल्या गृहप्रकल्पांतील सदनिकांची दस्त नोंदणी करू नये, असे आदेश सर्व दस्तनोंदणी कार्यालयांना दिले आहेत. जमिनींची दस्तनोंदणी करताना तुकडाबंदी कायद्याचे पालन करावे, अशाही सूचना दिल्या आहेत. या कायद्यांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी के ल्यास संबंधित मालमत्ता अनधिकृत ठरवण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील याबाबत खबरदारी घ्यावी. – श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unauthorized property erected without compliance with the fragmentation rera act akp

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले
ताज्या बातम्या