पुण्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना ; काकानेचे केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार!

लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देऊन करत होता अत्याचार

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

पुण्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवासांपूर्वी सलग धक्कादायक घटना घडल्याचे समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील वडगाव भागात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. साधारणपणे २०१८ डिसेंबर ते आजअखेर तिच्यावर आरोपी काकाने लैंगिक अत्याचार केले.

शिवाय, जर तू हे कोणाला सांगितले. तर मी तुझ्या भावाला मारून टाकेन, अशी धमकी देखील दिली होती. मात्र त्या पीडित मुलीने हा प्रकार इमारतीमधील एका महिलेला सांगितला. त्यानंतर त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार देताच, आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.अशी माहिती सिंहगड पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uncle sexually abuses minor nephew msr 87 svk

Next Story
धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून १२ वर्षीय मुलाचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी