किमान एक सत्र ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन

पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे शिक्षण संस्था सुरू करता येत नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांचे किमान पहिले सत्र ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावे लागणार असून, ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी तयारी केली आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे शिक्षण व्यवस्थेपुढे नवेच आव्हान निर्माण झाले आहे. या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी ऑनलाइन माध्यमाचा वापर सुरू करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी विद्यापीठांनी नवी यंत्रणा विकसित के ली आहे, तर काही विद्यापीठे उपलब्ध माध्यमांचाही वापर करत आहेत. काही विद्यापीठांमध्ये पदवी द्वितीय आणि तृतीय वर्षांसह पदव्युत्तर पदवीचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. तर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यापीठांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाईल.

सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठाची ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नवी यंत्रणाही विकसित के ली आहे. तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष राहुल कराड म्हणाले, की ऑनलाइन शिक्षणासाठी वेबेक्स, झूम, मायक्रोसॉफ्ट मीट आदी माध्यमांचा वापर के ला जाईल. थिअरी आणि प्रात्यक्षिक असे दोन भाग के ले जातील. प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन दृकश्राव्य पद्धतीने करून विद्यार्थी महाविद्यालयात येऊ लागल्यावर प्रात्यक्षिके  घेतली जातील. तसेच लर्निग मॅनेजमेंट सिस्टिम ही यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षणासह परीक्षेसाठी वल्र्ड असेसमेंट काउन्सिलचा आधार घेतला जाईल. त्यात विद्यार्थी परीक्षेबाबत सर्व प्रश्न विचारू शकताच. या पद्धतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असल्याने गैरप्रकाराला वाव नाही. ही पद्धत देशभरातील तीन ते चार विद्यापीठांमध्येच आहे.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, ‘पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने १५ जुलैपासून सुरू झाले आहे. तर पदवीस्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे करोना संसर्गाची स्थिती पाहता प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण सुरू न झाल्यास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू के ले जाणार आहे.’

करोना संसर्गाची स्थिती किती काळ राहील याचा काहीच अंदाज नाही. त्यामुळे ऑनलाइन अध्यापन प्रभावी करण्यासाठी व्हर्च्युअल लॅब, क्लाउड लॅब, व्हिडिओ लॅब, ई-बुक आणि ऑनलाइन परीक्षा पद्धती आदी पद्धती असे या शैक्षणिक वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षांचे अध्यापन होणार आहे. डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठीच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे एमआयटी एटीडी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

पूर्ण सत्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन अध्यापनामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करता येणार नाहीत. मात्र ती पुढील सत्रात करण्याची सुविधा केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठीची साधने नाहीत, ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांना साधने पुरवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

 डॉ. संजीव गलांडे, अधिष्ठाता, संशोधन आणि विकास, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे)