scorecardresearch

‘यूपीएससी’प्रमाणेच आता ‘एमपीएससी’ची गुणवत्ता यादी

सुधारित कार्यपद्धत २०२० आणि त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

‘यूपीएससी’प्रमाणेच आता ‘एमपीएससी’ची गुणवत्ता यादी
(संग्रहित फोटो)

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेतील निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार असून, बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. या नव्या पद्धतीमुळे अंतिम निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपद्धतींचा साकल्याने विचार करून निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या पाश्र्वभूमीवर आयोगाने निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणांसंदर्भात गुरुवारी माहिती दिली. आयोगामार्फ त आयोजित सर्व भरती प्रक्रियांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर संके तस्थळावर करण्यात येईल.

सुधारित कार्यपद्धत २०२० आणि त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियेपासून लागू करण्यात येणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार मुलाखती झाल्यावर शिफारसपात्र उमेदवारांची यादी तयार के ली जाते. त्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब होतो. मात्र आता पदांचा पसंतीक्रम गुणवत्ता यादीनंतर घेतला जाणार असल्याने मुलाखतीचा टप्पा झाल्यावर निकाल लवकर जाहीर होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणेचा निर्णय

लेखी परीक्षा, मुलाखतीतील गुण याबाबत माहिती नसल्याने उमेदवाराकडून सर्व पदांचे पसंतीक्रम दिले जातात. त्यामुळे पदे अडवली जातात. उदाहरणार्थ सेवेत असलेल्या उमेदवाराची त्याच पदासाठी  किं वा त्याच संवर्गातील पदासाठी निवड होते. मात्र आता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून त्यानंतर पसंतीक्रम मागवले जाणार असल्याने उमेदवाराला त्याच्या गुणांनुसार पसंतीक्रम देता येईल. त्यामुळे पदे अडवली जाण्याचे प्रकार थांबतील.

होणार काय?

बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. बहुसंवर्गीय पदांची भरती प्रक्रिया वगळता अन्य भरती प्रक्रियांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस केली जाईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc exam quality list akp

ताज्या बातम्या