राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी उत्साहात सुरूवात झाली. राजकीय नेत्यांसह मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजावला. तर मतदार रांगांची लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. राज्यात प्रथमच पुण्यातील कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे बारकोडचा वापर करण्यात आला आहे.
मतदान करण्यापूर्वी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटवण्यात येते. ही प्रक्रियेत अधिक वेळ जातो. त्यावर उपाय म्हणून आणि बोगस मतदानाला आळा बसवा म्हणून निवडणूक आयोगाकडून बूथ अॅपद्वारे बारकोडचा करण्यात येत आहे. याचा राज्यात पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे मतदारांची ओळख पटवण्यात येत आहे.
बूथ अॅपच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावलेला संकेत विध्वंस म्हणाला, “या बारकोडच्या माध्यमातून ओळख पटवण्यास कमी वेळ लागला. ही सुविधा चांगली असून, यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता, येण्यास अधिक मदत होणार आहे. पुढील काळात सर्व ठिकाणी अशा प्रकारची सुविधा निवडणूक आयोगाने केली पाहिजे,” असं त्यानं सांगितलं.
व्हिडीओ येथे पहा –
बूथ अॅपचे फायदे –
या बूथ अॅपचा उद्देश हा क्युआर कोडद्वारे मतदारांची ओळख पटविण्यासाठी केला जातो. यासाठी कमी कालावधी लागतो. त्यामुळे मतदारांचाही मतदानाच्या लाईनमध्ये कमी वेळ जातो. बोगस मतदानास आळा बसण्यास मदत होते. त्याचबरोबर प्रत्येक क्षणाची आकडेवारी समजण्यास प्रशासनाला मदत होते.