काही दिवसांपूर्वी पुण्यात मनसेच्यावतीने एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांना बोलवण्यात आलं. मात्र, त्यांना भाषण करुन दिलं नाही. या सर्व प्रकरणावरती वसंत मोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे किती आणि कोणाच्या तक्रारी करायच्या? आता जे होईल सहन करणार. एकदिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

“मी नाराज नाही आहे. पण, पक्षाच्या कार्यक्रमांना बोलावलं जात नाही. निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही. माझ्याबरोबरर असणाऱ्यांना तिकीट कापण्याची धमकी दिली जाते. मला पक्षात वेगळं ठेवण्यात येत आहे. मी काय पक्षातील दहशतवादी आहे का?,” असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला आहे.

हेही वाचा : “राज्यपाल पदावर बसलात म्हणून मान राखतोय नाहीतर…”, राज ठाकरेंकडून कोश्यारींचा समाचार

राज ठाकरेंकडे तक्रार करणार का? असे विचारले असताना वसंत मोरे म्हणाले, “किती आणि कोणाच्या तक्रारी करायच्या? मी फक्त तक्रारी करतो अशी प्रतिमा माझी होत आहे. आता जे होईन ते सहन करायचं ठरवलं आहे. तक्रारी करत बसणार नाही. एकदिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील,” असेही वसंत मोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून…”, नवनीत राणांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका; उद्धव ठाकरेंवरही साधलं शरसंधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी सतत १५ वर्ष निवडून येणारा मनसेचा एकमेव नगरसेवक आहे. मात्र, ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही ते मार्गदर्शन करतात आणि आम्हाला पुतळ्यासारखं बसवलं जातं. मी कार्यक्रमाला गेलो नाही, तर माझा फोटो बॅनरवर लावतात. मग बोलायला का देत नाही?,” असा प्रश्न वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.