पुणे : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक बहीण आणि कुटुंबीय असा परिवार आहे. चांदोरकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले. सध्या ते मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत होते. राजकारण, खाद्यसंस्कृती, सामाजिक क्षेत्र अशा विषयांवर त्यांचा अभ्यास होता. ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले होते. राज्य शासनाने समाजमाध्यमांसाठीच्या पत्रकारिता पुरस्काराने चांदोरकर यांना सन्मानित केले होते. ‘लोकसत्ता’साठीही त्यांनी लेखन केले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2022 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन
राज्य शासनाने समाजमाध्यमांसाठीच्या पत्रकारिता पुरस्काराने चांदोरकर यांना सन्मानित केले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-09-2022 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran journalist ashish chandorkar passed away zws