पुणे : देशातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक असलेल्या डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. प्रमोद पांडे गेले आठ महिने वेतनाविना असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र कुलगुरू पदाच्या वेतननिश्चिती प्रस्तावातील त्रुटींमुळे कुलगुरू पदाची वेतननिश्चिती झाली नसल्याचे उच्च शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. पुरातत्त्व, भाषाशास्त्र अशा विविध विद्याशाखांमध्ये डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर संस्था आहे. डॉ. वसंत शिंदे यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास दोन वर्षे हे पद रिक्त होते. त्यानंतर प्रा. प्रमोद पांडे यांची डेक्कन कॉलेजच्या कुलगुरू पदी जुलैमध्ये नियुक्ती करण्यात आली. डेक्कन कॉलेजने नुकतेच द्विशताब्दी वर्ष साजरे केले. अशातच प्रा. पांडे यांना गेले आठ महिने वेतन मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात प्रा. पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत बोलण्यास असमर्थता दर्शवली. तर डेक्कन कॉलेजच्या कुलगुरू पदाच्या वेतननिश्चिती प्रस्तावात त्रुटी असल्याने तो प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याचे उच्च शिक्षण विभागाच्या पुणे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

mumbai high court,
दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार, प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी निर्णय राखून ठेवला होता
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा