पुणे : वैद्यकीयचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा पुरेशी नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना पत्राद्वारे निर्देश दिले. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात खासगी इमारती भाड्याने घेऊन वसतिगृहाची सोय करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) नुकताच संप पुकारला होता. त्यावेळी मार्डच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चर्चा केली होती. या सकारात्मक चर्चेनंतर मार्डने संप मागे घेतला होता. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी वसतिगृहांची दुरुस्ती आणि इतर कामांसाठी निधी देण्याचे सरकारने मंजूर केले. याचबरोबर नवीन वसतिगृहे बांधण्यासही निधी देण्यासोबत नवीन वसतिगृहांचे काम पूर्ण होईपर्यंत इमारती भाड्याने घेऊन तात्पुरती वसतिगृहे उभारण्याचेही सरकारने जाहीर केले.

Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

हेही वाचा…Vallabh Benke Passes Away : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठविले आहे. त्यात निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचा आढावा घेण्यास सांगण्यात आले. निवासी डॉक्टरांची संख्या, वसतिगृहांची क्षमता, नवीन वसतिगृहांचे बांधकाम या गोष्टींचा यात समावेश आहे. निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची पर्यायी सुविधा न झाल्यास महाविद्यालयाच्या परिसरात भाड्याने इमारती घेऊन तिथे सुविधा सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वैद्यकीय महाविद्यालयांनी निवासी डॉक्टरांना वसतिगृहाच्या सुविधेसाठी खासगी इमारती भाड्याने घेण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी किती खर्च येणार याची माहितीही मागविण्यात आली आहे. या खर्चास वित्त विभागाची मंजुरी घेऊन तातडीने खासगी इमारतीत भाड्याने वसतिगृहे सुरू केली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…धक्कादायक: स्वत:च्याच आईचा गळा चिरून खून; पसार झालेल्या मुलाला शिर्डीतून अटक

निवासी डॉक्टरांसाठी सध्या आमच्याकडे वसतिगृहाची सुविधा पुरेशी आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र वसतिगृहासाठी अडचणी येऊ शकतात. कारण करोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पुढे ढकलले गेल्याने आधीचे विद्यार्थी बाहेर पडण्याआधी नवीन विद्यार्थी दाखल होतील. – डॉ. श्रीनिवास शिंत्रे, प्रभारी अधिष्ठाता, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय

हेही वाचा…फलटण ते पंढरपूर रेल्वेला गती! लवकरच कामाला मंजुरी मिळण्याची चिन्हे

बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय पदव्युत्तर विद्यार्थी

प्रथम वर्ष – २०७
द्वितीय वर्ष – १९८
तृतीय वर्ष – १६१
एकूण – ५६६