स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी ‘नारी समता मंच’ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya bal passed away bmh
First published on: 30-01-2020 at 10:43 IST