पुणे : आचारसंहितेचे होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ उपयोजन (ॲप) उपलब्ध करून दिले आहे. कसबा, चिंचवड मतदार संघांत होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नागरिकांना दोन्ही मतदारसंघातील आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या उपयोजनच्या माध्यमातून थेट ऑनलाइन पद्धतीने करता येते. यामध्ये अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, मद्य वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. सी-व्हिजिल उपयोजनमुळे आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे सोईचे झाले आहे. निवडणूक प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. या उपयोनचा वापर मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत करता येणार आहे.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा >>> पुणे: महिला वसतिगृहात प्रवेश न दिल्याने डिलिव्हरी बॉयची सटकली, व्यवस्थापकाला दांडक्याने मारहाण

उपयोजनद्वारे तक्रारींचे छायाचित्र किंवा चित्रीकरण पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. उपयोजन वापरकर्त्यास आपली ओळख लपवून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल क्रमांक आणि इतर प्रोफाइल तपशील उपयोजन प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारींच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत, मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई मात्र करण्यात येईल.

५९ तक्रारींचे निरसन

तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनिटांमध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५९ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी दिली.