पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ तोळे सोन्याचे दागिने असा एकुण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल कुकरेजा वय-४३ असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सिंधी समाजाच्या व्यक्तीच्या घरी मिळेल ते काम करून नोकरी करायचा. त्यांचा विश्वास संपादन करून दोन-तीन महिन्यांनी त्यांच्या घरी चोरी करून निघून जायचा. त्यानंतर पुन्हा दुसरा काम मिळवण्यासाठी अन्य एका सिंधी समाजाच्याच व्यक्तीचा शोध घ्यायचा, असं पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर जळगाव येथे विविध गुन्हे दाखल आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात नितीन नंदलाल गोगीया यांच्या घरी रात्री उशिरा सराईत आरोपी कुकरेजा याने चोरी केली होती. त्याने घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपसा केला होता. ज्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिण्यांचा समावेश आहे. त्यानुसार गोगीया यांनी वाकड पोलिसात तक्रार केली होती.
अखेर प्राप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे गुन्हे वाढत असल्यामुळे पोलिसांनी देखील कंबर कसल्याचं दिसून आलं आहे. वाकड पोलिसांनी सराईत गुन्हेगार अनिल उंदराज कुकरेजा या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने वाकड परिसरात घरफोडी केल्याचं कबूल केलं. आरोपीकडून १४ तोळे सोन्याचे दागिणे असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वी देखील जळगाव शहर आणि ग्रामीण भागात गुन्हे दाखल आहेत. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wakad police arrested the criminal msr
First published on: 04-01-2020 at 17:29 IST