सुप्रसिद्ध विचारवंत, राजकीय विश्लेषक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.
गेल्या चार महिन्यांपासून आजारी असलेल्या डॉ. सुमंत यांची प्रकृती गुरुवारी रात्री अधिकचं खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारांचे आणि राज्यशास्त्राचे ते गाढे अभ्यासक आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्यामुळे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष चळवळीतील महत्त्वाचा दुवा निखळला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2015 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत यांचे निधन
सुप्रसिद्ध विचारवंत, राजकीय विश्लेषक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
First published on: 11-04-2015 at 12:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Well known thinker political analyst dr yashwant sumant passed away