जेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले चिडतात…!

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एक बिनधास्त आणि शांत राजकीय व्यक्तीमत्व आहे, ते चिडलेले किंवा रागावलेले क्वचितच कोणी पाहिले असेल.

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एक बिनधास्त आणि शांत राजकीय व्यक्तीमत्व आहे. ते चिडलेले किंवा रागावलेले क्वचितच कोणी पाहिले असेल. मात्र, आज एका किरकोळ घटनेमुळे ते चक्क चिडले आणि त्यांच्या तोंडून काही आक्षेपार्ह शब्द बाहेर पडले.

सविस्तर माहिती अशी, ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ या पर्यटन बसचा उदघाटन कार्यक्रमावेळी मंत्री रामदास आठवले यांचे हलगी वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना मुलाखतीसाठी गराडा घातला आणि व्यासपीठावर जाण्यापूर्वीच त्यांना थांबवले. त्यानंतर ते चालत असतानाचा माध्यमांशी बोलत असताना अचानक एकाने जोरात हलगी वाजवली त्यामुळे त्यांच्या संवादात व्यत्यय आला, मात्र ते शांत राहिले. त्यानंतर पुन्हा ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना दुसऱ्यांदा जोरात हलगी वाजली, यावेळी मात्र क्षणभरात ते चिडले आणि त्यांच्या तोंडून आक्षेपार्ह शब्द बाहेर पडले. हा प्रकार माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे सुरु असताना झाला. त्यामुळे हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: When union minister ramdas athavale gets irritated aau

ताज्या बातम्या