‘नू’ किंवा ‘क्षी’ऐवजी ओमिक्रॉन नामकरण

दक्षिण आफ्रिकेत नवा उपप्रकार आढळून येईपर्यंत या संघटनेने आतापर्यंत ग्रीक बाराखडीची १२ नावे वापरली आहेत.

पुणे, : सार्स- सीओव्ही २ विषाणूच्या उत्परिवर्तित प्रकारांचे नाव ठारवताना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आतापर्यंत ग्रीक बाराखडीतील दोन अक्षरे वगळली आहेत. यापैकी एक अक्षर चीनमधील एक लोकप्रिय आडनाव असून, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग  तेच आडनाव लावतात.

करोना  उत्परिवर्तनांचा उल्लेख करताना डब्ल्यूएचओ ग्रीक अक्षरांचा वापर करत आहे, ज्यांची नावे अन्यथा लांब शास्त्रीय नावे राहिली असती.  दक्षिण आफ्रिकेत नवा उपप्रकार आढळून येईपर्यंत या संघटनेने आतापर्यंत ग्रीक बाराखडीची १२ नावे वापरली आहेत. या उत्परिवर्तित प्रकारासाठी डब्ल्यूएचओने ‘नू’ किंवा ‘क्षी’ यांच्याऐवजी ‘ओमिक्रॉन’ची निवड केली. ही दोन अक्षरे त्याच्यापूर्वीची आहेत. ‘नू’ या अक्षराच्या ‘न्यू’ अक्षराशी साधम्र्यामुळे संभ्रम निर्माण होईल, तर ‘क्षी’ हे  आडनाव असल्याने ही दोन्ही अक्षरे वगळण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Who skipped two greek letters to name new covid 19 variant omicron zws

ताज्या बातम्या