राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. श्रीरंग बारणे यांच्या विरोधात आम्ही प्रचार करून भाऊ पार्थ पवार याचा बदला घेणार आहे. अजित पवार हे पार्थ पवार याचा झालेला पराभव विसरले असतील आम्ही अद्यापही त्याचा पराभव विसरलो नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, संजोग वाघेरे यांच्या बाजूने आजचे वातावरण आहे. वाघेरे हे नवीन खासदार असतील. असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांना वडील मानायचे. त्यांना सोडून स्वतःच साम्राज्य आणि कारवाईपासून लपून राहण्यासाठी महायुती आणि भाजपसोबत अजित पवार गेले आहेत. अजित पवारांनी वडिलांचा विचार केला नाही. पुढे ते म्हणाले, ज्या व्यक्तीने मुलाचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्या गोष्टी विसरून ज्या उमेदवाराने पराभव केला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार येत असतील तर यावरूनच अजित पवारांची परिस्थिती कळून येत आहे. अजित पवार हे या सर्व गोष्टी विसरले असतील. मला पार्थला सांगायचं आहे. या गोष्टी मी विसरलो नाही. ज्या व्यक्तीने तुझा पराभव केला. त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी तुझा भाऊ इथं आलेला आहे.
हेही वाचा – पुणे : मुकुंदनगर येथील केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडागृहात आग
हेही वाचा – बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोलचा टँकर उलटला
पुढे रोहिते पवार म्हणाले, काही गोष्टी अजित पवार हे खोटं बोलत आहेत. एबी फॉर्म मला अजित पवारांनी दिला. मला निवडणूक लढायची होती. अपक्ष लढायचं नव्हतं. अजित पवार पन्नास टक्के खरे आणि खोटं बोलत आहेत. पुढे ते म्हणाले, पार्थ पवार यांना वाय नव्हे तर झेड सुरक्षा द्यायला हवी. महाराष्ट्रात वाढलेल्या गुन्हेगारीवर देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष नाही. नेत्यांच्या मुलांना सुरक्षा देत आहेत.