पुणे : मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर परिसरात अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली.

हेही वाचा – पुणे : बेपत्ता शाळकरी मुलीची माहिती देणाऱ्या नागरिकांना पोलीस आयुक्तांकडून बक्षीस

हेही वाचा – गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ तृप्ती हॉटेलसमोर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा अल्कोहोल वाहतूक करणारा टँकर सांगलीकडून वसईला निघाला होता. टँकर उलटल्याची माहिती नांदेड सिटी अग्निशमन दलाला मिळाली. जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या टँकरमधील चालक आणि आणखी एकाला बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना रुग्णलयात दाखल करण्यात आले. क्रेनचा वापर करून टँकर बाजूला काढण्यात आला. रस्ता वाहतुकीस मोकळा करून देण्यात आल. अग्निशमन दलाचे जवान सुजित पाटील, राठोड, शुभम माळी, पंकज माळी, साळुंखे, मायनाले यांनी ही कामगिरी केली.