पिंपरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे भाजप ठाकरे यांना कसे सोबत घेईल, असा सवाल करत भाजप ठाकरे यांना सोबत घेणार नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.मावळचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘रोड शो’ने सांगता झाली. पिंपरी-चिंचवड शहरात अडीच तास मुख्यमंत्र्यांनी ‘रोड शो’ केला. खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

देशासाठी काही करायचे असेल तर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी खऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यावर बोलताना मुख्यंमत्री शिंदे म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे त्यांना भाजप सोबत घेणार नाही.

हेही वाचा >>>साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

इंग्रजांना घालवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहेत, या शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. दहा वर्षांत अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांनाही पाठीमागे सोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. रोखठोक बोलणारे, पाकिस्तानला थडा शिकविणारे, ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणारे मोदी आहेत. पूर्वी सैनिकांचे मुंडके छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याची हिंमत दहशतवादी करत होते. आता ती हिंमत गेली. एकही बॉम्बस्फोट होत नाही. ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून सैन्यांवरच्या हल्ल्याचा बदला घेणारे पंतप्रधान आहेत. मजबूर नाही तर मजबूत भारत होत आहे. एकीकडे देशभक्त आणि दुसरीकडे देशद्रोहाची भाषा करणारे आहेत. पराभव होणार असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून नवीन मुद्दे आणून विकासापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पुन्हा एकदा मोदी सरकार हे जनतेने ठरविल्याचेही शिंदे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा

राज्यात मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चौथ्या टप्प्याचे मतदान १३ तारखेला होत आहे. कोणी काहीही बोलू देत, पण राज्यात महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, हे निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.