सुरत येथील एका प्रदर्शनातून २७ लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार चोरल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे. तिच्याकडून चोरीचा हार जप्त करण्यात आला असून त्या महिलेस ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलिसांचे पथक पुण्यात आले आहे.
राखी प्रदीप वाणी (वय ३२, रा. सेहसपूर रस्ता, नरोडा अहमदाबाद) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिची बहीण रेखा हेमराज वाणी आणि मेव्हणा हेमराज वाणी हे फरार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन स्नॅचिंग विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी चंद्रकांत फडतरे यांना बिबवेवाडी येथे एक नवीन कुटुंब राहण्यास आले आहे, असे समजले. सुरतमधील चोरी करणाऱ्या आरोपीच्या फोटोसारखेच ते कुटुंब दिसत असून त्यांच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी त्या घरी छापा टाकून राखी हिला अटक केली. तिला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यामुळे बहीण रेखा आणि तिचा नवरा हेमराज हे पळून गेले. घराच्या झडतीमध्ये सोन्याचा हार मिळाला. त्याबाबत चौकशी केली असता, तो पंधरा दिवसांपूर्वी सुरत येथील एका प्रदर्शनातून चोरला होता, असे स्पष्ट झाले. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात ते आले होते. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
गुजरातमधून हिऱ्यांचा २७ लाखांचा हार चोरणाऱ्या महिलेस अटक; हार जप्त
सुरत येथील एका प्रदर्शनातून २७ लाख रुपये किमतीचा हिऱ्याचा हार चोरल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे.
First published on: 19-01-2014 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman arrested as she stealed garland of diamonds