scorecardresearch

सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी लाच स्वीकारताना महिला API ‘एसीबी’च्या जाळ्यात

पाच लाखांची केली होती मागणी; तडजोडअंती दोन लाख घेताना पकडले

crime
(सांकेतिक फोटो)

महिला डॉक्टरकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना सिंधुदुर्ग येथील महिला पोलीस अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. नलीनी शंकर शिंदे असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी नलीनी यांनी पाच लाखांची मागणी केली होती. ही कारवाई निगडी परिसरात करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अकडल्या आहेत. याबाबत जेष्ठ महिला डॉक्टरने पुण्याच्या एसीबीकडे तक्रार केली होती. नलीनी शंकर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणूक महिला अत्याचार निवारण कक्ष सिंधुदुर्ग असे महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. नलीनी या मालवण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याच्या तपासाठी निगडीत आल्या होत्या. त्यांनी जेष्ठ महिला डॉक्टरकडे सोनोग्राफी सेंटर आणि तपासात सहकार्य करते असे म्हणून ५ लाखांची लाच मागितली, तडजोडअंती २ लाख घ्यायचे ठरले, ते पैसे घेताना एसीबीने पोलीस अधिकारी नलीनी यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Women apis trap acb while accepting bribe for not sealing sonography center kjp 91 msr

ताज्या बातम्या